अहमदाबाद प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती जगभर साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दिल्लीसह विविध राज्यांमध्ये महात्मा गांधींवरील व्याख्याने, चित्रप्रदर्शने, समाज उपयोगी शिबिरे, माहितीपटाचे प्रदर्शन आदी कार्यक्रम होत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमात जाऊन गांधीजींना आदरांजली अर्पण केली. ‘गांधी हेरिटेज पोर्टल’ या वेबसाइटवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित विविध कागदपत्रे, लेख, फोटो उपलब्ध आहेत. या वेबसाइटवर दर महिन्याला २० हजार नवी पाने अपलोड केली जातात. गांधीजींच्या १५० जयंतीनिमित्त या वेबसाइटवर नवी माहिती अपलोड करण्यात आली आहे. गांधीजींवरील पुस्तके, जर्नल, फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लीप, पोस्टर, स्टॅम्प आदी गोष्टी वेबसाइटवर ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काळात महात्मा गांधी येथील बेलियाघाटमध्ये ज्या वास्तूत निवास करीत होते, त्या वास्तूचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून, गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज, बुधवारी संग्रहालय सर्वांसाठी खुले होणार आहे. गांधीजींची दुर्मीळ छायाचित्रे, उपकरणे पाहण्याची संधी यामुळे इतिहासप्रेमींना मिळणार आहे. बेलियाघाटमधील ‘हैदरी मंजिल’ या वास्तूमध्ये गांधीजींनी साधारण तीन आठवडे वास्तव्य केले होते. सन १९८५मध्ये या वास्तूचे ‘गांधी भवन’ असे नामकरण करण्यात आले.