जिल्ह्यात आज 2 हजार 189 जणांना पहिली तर 264 जणांना घेतली दुसरी कोवीशिल्डची लस

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 39 लसीकरण केंद्रावर आज दिवसभरात 2 हजार 189 जणांना कोवीशील्डची पहिली लस तर 264 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 1 लाख 29 हजार 678 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात आज गुरूवार 1 एप्रिल रोजी तब्बल 1 हजार 167 बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 39 ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. 

जिल्हा शासकीय रूग्णालय-221, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल-150, जामनेर-46, चोपडा-103, मुक्ताईनगर-53, चाळीसगाव-85,   पारोळा-87, अमळनेर-125, पाचोरा-41, रावेर-51, यावल-84, भडगाव-66, बोदवड-57, एरंडोल-46, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-301, धरणगाव-42, जैन हॉस्पिटल-60,  पाल-8, पिंपळगाव-13, पहूर-21, नाव्ही-83, सावदा-118, रोटरी क्लब जळगाव -190, नानीबाई हेल्त पोस्ट- 98, चेतनदास-40 असे एकुण 2 हजार 189 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 264 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content