वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सासरच्या जाचाला कंटाळून वरणगाव येथील येथील विवाहितेची विहीरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मन्यारखेडा परिसरात गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याबाबत शनिवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता धिरज भंगाळे रा. वरणगाव ता. भुसावळ असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा येथील माहेर असलेल्या योगिता भंगाळे यांचा विवाह वरणगाव येथील धिरज कडू भंगाळे याच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्न झाल्यापासून विवाहितेला वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील संजय झांबरे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुभाष वराडे यांनी याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धिरज कडू भंगाळे रा. भंगाळे वाडा, वरणगाव याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे करीत आहे.




