पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील पी.एस.पाटील विद्यालयाती खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे यांच्या द्वारे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद नाशिक भगूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात शालेय कुस्ती स्पधेऀत यश संपादन केले.
यात यामिनी चंद्रकांत कोळी ५८ किलो गटात (प्रथम), मिनश्री तुकाराम मोरे ५० किलो गटात (तृतीय) या खेळाडूंची घवघवीत यश संपादन केले. या खेळाडुंची राज्य पातळीवर खेळण्याकरिता निवड करण्यात आली. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिश काशिद, सहसचिव दिपक गरुड, महिला संचालिका उज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, स्थानिक सल्लागार समिति अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्त यांचेसह विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी पर्यवेक्षक एस. व्ही. शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक आर. एस. निकम, अविनाश निकम, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.