तरुणाच्या छेडछानीला कंटाळलेली तरुणी म्हणाली मी ‘आत्महत्या करू का’ ?; शहर पोलिसांना संतप्त सवाल

जळगाव प्रतिनिधी । साहेब किती वेळेस तक्रार करु… दररोज येता-जातांना त्या तरुणाकडू त्रास दिला जातो. कारवाई करा नाही तर मला आत्महत्येची परवागी द्या.. असे म्हणत संतप्त झालेल्या तरुणीने शहर पोलिसांकडे आपली व्यथा मांडली. यावर ठाणे अंमलदाराने त्या तरुणीची समजूत काढीत त्या तरुणावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

शहरातील चौघुले प्लॉटमध्ये राहणारी एक तरुणी फुले मार्केटमध्ये कामाला आहे. गेल्या वर्षभरापासून अमोल सुकलाल ठाकूर हा तरुण त्या तरुणीला त्रास देत आहे. ही तरुणी घरुन कामावर जाण्यासाठी किंवा कामावरुन घरी जाण्यासाठी जात असतांना अमोल हा तिचा पाठलाग करुन तिला अश्‍लिल इशारे करतो. दररोजच्या या छेडखानीला कंटाळून तरुणीने बुधवारी दुपारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात धाव घेत ठाणे अंमलदारांकडे घडलेल्या प्रकाराबाबत आपबिती कथन केली.

पोलीसात अनेक तक्रारी दाखल

वर्षभरापासून शहरातील हरिओम नगरातील अमोल ठाकूर हा त्या तरुणीचा पाठलाग करुन तिला अश्‍लिल इशारे करतो. त्या तरुणीने सुरुवातीला ११ नोव्हेंबर २०१९ ला शहर पोलीसात, १२ नोव्हेंबर २०१९ ला शनिपेठ पोलीस, २० डिसेंबर २०१९ ला पुन्हा शहर पोलीसात तक्रार दाखल केली होती. याठिकाणी तीन वेळा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तक्रार केल्यानंतरही केला होता विनयभंग

पोलीसात तीनवेळा तक्रार दिल्यानंतर देखील अमोल ठाकूरने गेल्या ९ फेब्रुवारी २०२० रोजी फुले मार्केटच्या परिसरात तरुणीची छेड काढून तिचा विनभंग केला होता. यावेळी त्या तरुणीने अमोल ठाकूरविरुद्ध शहर पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

मोबाईल क्रमांक बदलविल्यानंतर करतोय पाठलाग

तीन वेळा तक्रार एक वेळा त्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तरीही अमोल ठाकूरकडून तरुणीची छेडखानी सुरुच आहे. तसेच त्या तरुणीचा मोबाईल क्रमांकावर अमोल हा वारंवार फोन करीत असल्याने त्या तरुणीने आपला मोबाईल क्रमांक देखील बदलून घेतला. मात्र तरी देखील अमोल हा तरुणीचा पाठलाग करीत तीची दररोज छेडखानी करीत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content