Home क्राईम सासरच्या छळाला कंटाळून तरूणाचं टोकाचं पाऊल ; नोटमधून धक्कादायक खुलासा !

सासरच्या छळाला कंटाळून तरूणाचं टोकाचं पाऊल ; नोटमधून धक्कादायक खुलासा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील एका तरुणाने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे या मृत तरुणाचे नाव असून त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्या व्यक्तींची नावे नमूद केली आहेत.

मृत्यूपुर्वी लिहिली नोटस् :
गौरवने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्याने आपली सासू, साली आणि साडू यांच्याकडून होणाऱ्या छळाचा सविस्तर उल्लेख केला आहे. सासरच्या मंडळींकडून सातत्याने पैशांचा तगादा लावला जात होता आणि त्याला विविध प्रकारच्या धमक्याही दिल्या जात होत्या. या सततच्या मानसिक त्रासामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल :
याप्रकरणी मयत गौरवच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आणि सुसाईड नोटमधील पुराव्यावरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरवची सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसांकडून तपास सुरू :
कासोदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. जप्त केलेली सुसाईड नोट हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. सासरच्या मंडळींनी नक्की कोणत्या कारणावरून पैशांची मागणी केली होती आणि गौरववर कशा प्रकारचा दबाव टाकला जात होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे भातखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound