कर्नाटकात टीपू सुलतान जयंतीवर बंदी

tipu sultan

 

बंगळुरु (वृत्तसंस्था) कर्नाटकातील नव्या भाजपा सरकारने टीपू सुलतान जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे.

 

 

भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवला होता. कडगु लोकांच्याविरोधात टीपू सुलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते. या युद्धात कडगु लोग मोठ्या प्रमाणात शहीद झाले होते, असे के. जी. बोपय्या यांनी पत्रात म्हटले होते. त्यानुसार सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कन्नड संस्कृती विभागाला यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content