भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टायगर ग्रुप भुसावळच्या वतीने मयूर भाऊ भोई यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम तसेच अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
रविवार, दि. ३ जुलै रोजी ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात वृक्षारोपण करून जास्तीत जास्त ऑक्सिजन कसे निर्माण करता येईल ही संकल्पना समोर ठेवून भुसावळ येथील टायगर ग्रुपचे कार्यकर्ते यांनी हा संकल्प केला आणि भुसावळमधील नगरपालिका शाळा क्र.१ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
रेल्वे स्टेशनजवळील दर्गा व नहाटा चौफुली या ठिकाणी अन्न वाटप करण्यात आले. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सागर कांबळे, खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर व जिल्हा प्रमुख सदस्य गौरव उमप यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आखून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.
यावेळी संघटनेचे कार्यकर्ते संदीप सपकाळे, विशाल सपकाळे, सागर कोळी, रवी वाघ, सनी भोई, आकाश भोई, नरेंद्र भोई, गणेश भोई, गोलू भोई, भरत भोई, मनोज भोई, तुषार भोई,मंगल पाटील, राजू भोई आदी उपस्थित होते.