चाळीसगांव (प्रतिनिधी) येथील जे.सी.आय चाळीसगांव सिटीतर्फे आज महावीर हॉस्पिटलमध्ये ‘सॅल्यूट टू सायलेंट वर्कर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्स कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येवून त्यांना भेटवस्तू म्हणून जेवणाचे टिफिन वितरीत करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित जैन उपस्थित होते.
कार्यक्रमात जे.सी.आय.चे २०१९ चे अध्यक्ष अफसर खाटीक, सचिव साहिल दाभाडे, गजानन मोरे, खुशाल पाटील, मुराद पटेल, हेमंत देवरे, सुशील सोनवणे, हेमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने जे.सी.आय. सदस्यांची उपस्थिती होती. डॉ. जैन यांनी त्यांच्या मनोगतात जे.सी.आय. परिवारातील सदस्यांच्या समाजसेवेचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.