भरदिवसा मिरची पूड फेकून मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यास लुटले

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद रस्त्यावरून जातांना दोन अज्ञात चोरट्यांनी मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यास अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पुड फेकून ५५ हजारांची लुट केली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आज दि.६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास केशव पाटील (वय३५) राहणार दहीगाव तालुका यावल व्यवसाय सचिन एजन्सीज यावल येथील रिलायन्स जिओ कंपनीचे रिचार्च पैसे ग्रामीण क्षेत्रातुन गोळा करतो. केशव पाटील आपल्या मोटारसायकल (क्र.एमएच १९ ए एस. २६२३) बजाज प्लॅटीना या वाहनाने नेहमी प्रमाणे रिलायन्स जिओ कंपनीची रिचार्चची कोरपावली, सावखेडा सिम, मोहराळा दहिगाव, सातोद या गावातुन उधारीची ५५ हजार ३६४ रुपयांची रोख रक्कम घेवुन सातोद हुन यावलकडे येत असतांना रस्त्यावरील बांधेल नाल्या जवळ एका अज्ञान चोरट्याने काटेरी झुडपे तोडुन रस्त्यावरून घेवुन जात असतांना सदर केशव पाटील यांनी आपल्या ताब्यातील मोटारसायकलचा वेग कमी केला असता मागुन आलेल्या एका ईसमाने पाटील यांच्या टोळ्यात मिरची टाकुन त्यांच्याकडील वसुल रक्कम घेवुन दोघ अज्ञात चोरटे पसार झालेत. केशव पाटील यांनी सांगीतल्याप्रमाणे, दोघांचे ३०ते ३५ वर्ष असावे. दोघांनी तोंडाला रुमालाने बांधलेले होते. 

या लुटारूंनी माझ्याकडील रिलायन्स जिओ कंपनीच्या रिचार्चची उधारी वसुलीची सुमारे ५२ हजार रुपये रोख आणी ३००० हजार रुपये किमतीचे दोन रिलायन्स जिओ कंपनी मोबाईल हिसकावुन घेवुन पसार झाले आहेत. या संदर्भात सचिन एजन्सीजचे रिचार्च वसुली कर्मचारी केशव रामदास पाटील राहणार दहिगाव तालुका यावल यांनी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटयांविरूद्ध फिर्याद दाखल केल्याने सिआरपीसी कलम१५४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

 

Protected Content