जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या ,वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ओलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम मंच मिळावा यासाठी जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू झाले आहे, असे प्रतिपादन क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंच्यावर या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, स्पोर्ट एथोरिटी ऑफ इंडिया प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकूमार बेंडाळे, उद्योजक अशोक जैन, आ. सुरेश भोळे, उज्वला बेंडाळे , माजी आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. केतकी पाटील प्रा. डॉ. स. ना. भारंबे, सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केज़ो आणि केसीई सोसायटीचे संचालक डी. टी. पाटील, प्रविणकुमार जंगले, भरत अमळकर, संजय प्रभूदेसाई, प्राचार्य अशोक राणे,हर्षवर्धन जावळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना रक्षा खडसे यांनी प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडियाच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडावे यासाठी सतत प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत जळगाव जिल्ह्यातील उद्योगपति यांनी सीएसआर फंडातून गरजू खेळाडूना प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून ध्यावेत तसेच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला एकलव्य क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यानी मल्ल खांब प्रात्यक्षिक करून दाखवले. कान्ह ललित कला केंद्राच्या संगीत विभागाने स्वागत गीत सादर केले. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण सादर केले.
के. सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुलात आयोजन केले याबद्दल आभार व्यक्त केले. एकलव्य क्रीडा संकुलात विविध खेळाचे आयोजन केले जाते. त्यासह विविध स्पर्धा आयोजन करत असतो यासाठी के. सी.ई. सोसायटीत प्रशस्त मैदान,जिमखाना सुविधा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यानी खेळांमध्ये सहभाग घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खान्देशातील विद्यार्थ्याना विविध खेळ प्रकारात पारंगत होता यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. या मध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात.यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ,राज्य व जिल्हास्तराव आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.
यावेळी माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांनी क्रीडा क्षेत्रातील अडचणी आणि त्यासाठी मदत व्हावी याबद्दल आपले मनोगत मांडले. या अनुषंगाने खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चे एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले असून या शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती, बॉक्सिंग, धनुर्विद्या, हॉकी, खोखो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास चे मूल्यमापन होणार असून त्याकरिता एकलव्य क्रीडा संकुलचे ४० प्रशिक्षक व ३० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास ८ ते १० हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत अशी माहिती मु.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर , प्रा.योगेश महाले यांनी केले. यावेळी विद्यार्थी खेळाडूंची मोठ्या संख्येने गर्दी होती.