शेगाव येथे ‘द बर्निंग मोटारसायकल’चा थरार ! (व्हिडीओ)

शेगाव, प्रतिनिधी । येथील केवलराम पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकला अचानक आग लागली. दुचाकीने पेट घेतला मात्र सुदैवाने कोणतेही जिवीतहानी झाली नाही. परंतु, अचानक घडलेल्या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरीकांची एकच धावपळ उडाली.

मुळगांव कालखेडचे ऋषिकेश गुरव गजानन हल्ली मुक्काम निमकवडा हे त्यांच्या आईची तब्येत खराब असल्याने भेंडवड येथून बहिणीला व त्यांच्या भाचीला घेउन मोटार सायकलने निमकवडा येथे जात होते. यादरम्यान शेगावच्या केवलराम पेट्रोल पंपावर त्यांनी दुपारी १२:३० ते १ वाजेच्या सुमारास १०० रु चे पेट्रोल टाकले मोटार सायकल पेट्रोल पम्पासमोर उभी केली. यावेळी मोटरसायकल मधून पेट्रोल गळती झाल्याने तसेच वायरिंगच्या स्पार्किंगमुळे मोटार सायकलने अचानक पेट घेतला असे ऋषिकेश गुरव यांनी सांगितले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हि आग आटोक्यात आणली. मात्र अचानक घडलेल्या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरीकांची एकच धावपळ उडाली.  मोटरसायकल लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन चीलात्रे,आनंद बढे, प्रफुल्ल आढाव, गजानन शेट्टे यांनी अथक परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/925241511599839

 

Protected Content