विहीरीत पडलेल्या गाईला शहरातील तीन तरूणांनी दिले जीवनदान

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील एका विहीरीत गाय पडल्याची घटना घडली होती. या गाईला परिसरातील तीन तरूणांनी अथक परिश्रमांने विहीरीबाहेर काढले. या गाईला जीवदान देण्यात प्रथम सुर्यवंशी, चेतन भोई, डिगंबर मराठे या तीन तरूणांनी अथक परिश्रम केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील साखरी विहीर परिसरातील एका विहीरीजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास जितू महाजन यांना जोराचा आवाज ऐकू आला. त्यांनी लागलीच धाव घेतली असता त्यांना विहीरी गाय पडलेली आढळून आली असता त्यांनी लगेच प्रथम सूर्यवंशी यांना फोन केला.

त्यानंतर प्रथम सूर्यवंशी यांनी सचिन महाजन, चेतन भोई, डिगंबर मराठे, बापू बडगुजर, गजानन महाजन, जीतू महाजन, गोटू महाजन, महेश महाजन, विशाल महाजन आणि सामाजिक कार्यकर्ते विजूभाऊ महाजन यांनी विहीरी पडलेल्या गाईला वाचवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने गाईच्या पोटाला दोर बांधून अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले. व तिला नवीन जीवदान दिले.

Protected Content