सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सांगोला – पंढरपूर महामार्गावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मांजरी व बामणी गावालगत घडला. महाळाप्पा महादेव धनगर, विठ्ठल बिरा दिवटे व बिराप्पा नवलप्पा कोळेकर अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुीसार, रविवारी रात्री 9 च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोडवरील बामणी व मांजरी ओढ्याच्या पुलालगत कारने (एमएच 42 एच 7993) दुचाकीला (केए 23 ईडब्लू 7016) जोरदार धडक दिली. त्यात वरील तिन्ही तरुण जागीच ठार झाले. हे तिघे तनाळी ता. पंढरपूर येथून शिरढोण येथे देव दर्शनाला जात होते. हे तिघेही मेंढपाळ आहेत. या प्रकरणी बिरू महादेव धनगर यांच्या तक्रारीनुसार सांगोला पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.