पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे मंगळवारी रात्री तीन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. तासाभरात दोन दुचाकी सापडल्या असून सदर घटना माळी समाज मंगल कार्यालयाच्या परीसरात घडली आहे. या प्रकरणी पहूर पोलीसात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पहूर कसबे येथील माळीसमाज मंगलकार्यालयात काल विवाह सोहळा असल्याने गर्दी होती. या गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. यादरम्यान एम एच १९ एजे ०३४१ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेल्याचे मनोज जोशी यांच्या लक्षात येताच शोधा शोध सुरू झाली. याच्या काही अंतराने ज्ञानेश्वर कुमावत यांची एम एच १७ -५६६८ क्रमांकाची व पाळधी येथून विवाह साठी आलेले समाधान भोंबे यांची विनानंबर दुचाकी चोरीला गेल्याची चर्चा झाली.
शोधा शोध करून ज्ञानेश्वर कुमावत व समाधान भोंबे यांची दुचाकी कार्यालयापासून थोड्या अंतरावर असलेल्या वाघूर नदीच्या पात्रत सापडली.दुचाकींची खात्री करून संबधीतांनी दुचाकी ताब्यात घेतल्या. तर मनोज जोशी यांची दुचाकी चोरी ला गेली आहे. यादरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी अमोल पाटील, गोपाळ माळी व राहूल पाटील यांनी धाव घेऊन मदत कार्य केले. तर सोबत शिक्षक रत्नाकर पाटील व रवींद्र लाठे यांनी रात्री बारा पर्यंत शोध मोहीम साठी मदत कार्य केले.मनोज जोशी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दुचाकीचे शोधकार्य संपून घराकडे येत असताना रत्नाकर पाटील व मनोज जोशी यांना एक संशयित युवक पाचोरा रस्त्यावर आढळला.तर सीसीटीव्ही कँमेर्यात याभागातील दोन घरांची पाहणी करतांना हा युवक सीसीटीव्ही त कैद झाला आहे. यांनंतर संबधीत युवकाला कानघुस लागताच त्याने संतोषीमाता नगर कडे काढता पाय घेतला.याची माहिती रात्री एक वाजता मिळताच पोलीस कर्मचारी गोपाळ गायकवाड, जिवन बंजारा व हेमंत सोणवणे यांनी धाव घेऊन पाहणी केली. पण संशयीत युवक निदर्शनास आला नाही.