श्रीनगर वृत्तसंस्था । दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तारिगाम येथे सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले. मात्र डीएसपी अमन ठाकूर या चकमकीत शहीद झाले.
कुलगाम परिसरातील तारिगाम भागात काही दहशतवादी लपून असल्याची खबर सैन्याला मिळताच या क्षेत्राला घेराव घालण्यात आला. सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू होती. तेवढ्यात दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली. त्याला सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केले. मात्र यात डीएसपी अमन ठाकूर या अधिकार्याला वीरमरण प्राप्त झाले.