Home राष्ट्रीय जम्मू-काश्मिरात तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरात तीन दहशतवादी ठार

0
22

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरातील शोपिया जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या चकमकीत आपल्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

शोपिया भागात असणार्‍या केल्लर येथे काही दहशतवादी लपून बसल्याची खबर जम्मू-काश्मिर पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलीस आणि जवानांनी या परिसरात पहाटे शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे पोलीस आणि जवानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि जवानांमध्ये तासभर चकमक उडाली. यावेळी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात जवानांना यश आलं. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने या परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound