पाठलाग करून अटक केलेल्या तिघा संशयितांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळू चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार हे शस्त्रांसह वाहनातून येत असतांना पोलीसांनी खडका चौफुलीवर पाठलाग करून तीन जणांना अटक केली होती. या तील मुख्य संशयित आरोपी गिरीश तायडे हा पसार झाला होता. अटकेतील तिघा संशयित आरोपींना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता  भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुविख्यात गिरीश तायडे याने काही दिवसांपूर्वी महसूल पथकावर चोरीची वाळू पकडल्यानंतर हल्ला केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्कॉर्पिओ (एमएच-19 डीव्ही 2333) द्वारे भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर येत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आढाव यांना मिळाल्यानंतर रविवारी १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता खडका चौफुलीवर नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाई मुख्य आरोपी पसार झाला होता. परंतू धीरज प्रकाश सोनवणे (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका), मुकेश जयदेव लोढवाल (23, ज्ञानज्योती शाळेजवळ, बिंदीया नगर, खडका) व संजय शांताराम कोळी (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका या तीन संशयित आरोपी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३  गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतूस, ६ फायबर रॉड, ३ मोबाईल व स्कॉर्पिओ वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आले होते. दरम्यान, अटकेतील तिघा संशयित आरोपींना  सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता  भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Protected Content