पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपॅड परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.
यामध्ये इयत्ता पहिलीतील मानसी भूषण सोळुंके, इयत्ता दुसरीतील अनुष्का दीपक पाटील व इयत्ता तिसरीतील तेजल यशवंत पवार यांना १०० पैकी १०० गुण मिळवुन ऑलिंम्पॅड परिक्षेत गोल्ड मेडल व प्रमाणपत्र मिळविले. या बरोबरच सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी ओलिंम्पॅड परिक्षेचे जळगाव समन्वयक नारायण पवार हे होते. प्राचार्य यशवंत पवार यांनी विजेता विद्यार्थ्यांचा गौरव व अभिनंदन केले. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीनंतर विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सहभाग नोंदवता येत नव्हता परंतु त्या परिस्थितीतही क्रिएटिव्ह स्कूलने ऑनलाइन एज्युकेशन सुरू ठेवून या परीक्षेसाठी वीस विद्यार्थ्यांना सहभागी केलेले होते. व आपले बुद्धी चातुर्य दाखवण्यासाठी ओलिम्पॅड परीक्षाचे मार्गदर्शन केले होते.
जळगाव जिल्हा ओलिंम्पॅड समन्वयक नारायण पवार यांनी आपल्या मनोगत सांगितले की, ग्रामीण भागातील क्रिएटिव्ह स्कूल ही पहिली स्कूल आहे. ज्यांनी या परिक्षेमध्ये सहभाग नोंदविला व भरघोस तीन गोल्ड मेडल मिळवले यासाठी त्यांनी संस्थेचे स्कूलचे व शिक्षकांचेही कौतुक केले. या यशामागे मार्गदर्शन म्हणून प्रा. यशवंत पवार, शिक्षिका वृंद अरुंधती राजेंद्र, मनीषा बडगुजर, नम्रता पवार, उज्वला महाले यांनी मेहनत घेतली. यशस्वी झालेल्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने प्रा. यशवंत पवार व पालक वर्ग यांच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.