साखरपुड्यात जेवन खाल्ल्याने तीन जणांचा मृत्यू; अनेक जणांची प्रकृती गंभीर

जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अन्नातून विषबाधा झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एंगेजमेंट पार्टीमध्ये जेवण खाल्ल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन डझनहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ही घटना राजस्थानच्या उदयपूरमधील कोटडा ​​पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मेजवानी खाल्ल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अनेक रुग्णांना गुजरातला रेफरही करण्यात आले आहे. दूषित अन्न खाल्ल्याने एकाच वेळी अनेकांची प्रकृती बिघडल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटडा ​​येथे एका कार्यक्रमादरम्यान खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने मोठ्या संख्येने लोकांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्नातून विषबाधा होऊन आजारी पडलेल्या तीन जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कॅबिनेट मंत्री बाबूलाल खराडी यांनीही रुग्णालयात पोहोचून रुग्णांची विचारपूस केली. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी अशोक यांनी सांगितले की, हा संपूर्ण प्रकार सोमवारी घडला असून, सोमवारी रात्री तहसील कोटडा येथे एका तरुणाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. पुना पारगी नावाच्या व्यक्तीच्या मुलाची साखरपुडा होता. यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि त्यांनी तिथे जेवणही केले होतं.

Protected Content