नवी दिल्ली- कोरोनाची जगापुढे माहिती येऊन वर्ष उलटत आले तरी अजून त्याबाबतची नवी नवी लक्षणे समोर येत आहेत. कोरोनाची नवी तीन लक्षणे समोर आली आहेत.
ताप, खोकला, थंडी, श्वसनास अडथळा, डोकेदुखी, अंगदुखी आणि नाक गळणे ही समान लक्षणे आढळतात. हाता पायांच्या बोटांना थंडीमुळे आलेली सूज हे सुध्दा करोनाचे लक्षण असल्याचे ट्विट काही डॉक्टरांनी केले आहे. याचे छायाचित्र ट्विट करून त्यात हाता पायांना आलेली सूज असणाऱ्या व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ करोनामुळे पावलांना सूज येऊन पायांचा रंग पांढरट होतो. डॉक्टरांच्या मते ही लक्षणे सामान्यत: लहान मुलांमध्ये आढळतात. त्याला या डॉक्टरांनी ‘कोवीड टोज’ असे नाव दिले आहे.
डेनिस नावाच्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, पावलांना आलेली सूज वगळता या बाधितात अन्य कोणतीही लक्षणे नव्हती. ती सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना भेटावे लागते अशा कामावर असते, त्यामुळे हा विषाणू कोणत्या स्वरूपात कसा समोर येईल, हे सांगता येत नाही.