Home क्राईम निमगावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

निमगावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

0
53

अहमदनगर प्रतिनिधी । शिर्डी येथून जवळ असणार्‍या निमगावातल्या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसर हादरला आहे. यात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास निमगावातील अर्जुन पन्हाळे याने शेजारी राहणार्‍या ठाकूर परिवारावर कोयत्याने हल्ला चढविला. यात नामदेव ठाकूर, त्यांची पत्नी दगाबाई आणि मुलगी खुशी यांचा जागीच मृत्यू झाला असून राजेंद्र ठाकूर व तावू ठाकूर हे जखमी झाले आहेत. या कुटुंबातील सहा वर्षीय मुलगी मात्र यातून सुदैवाने बचावली आहे. दरम्यान, या क्रूर कृत्यानंतर शेजारी लपून बसलेल्या अर्जुन पन्हाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Protected Content

Play sound