पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात आज घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये १५ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून यात पहूर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पहूर येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत आज दि. २३ रोजी घेण्यात आलेल्या १०० रॅपिड अॅन्टीजेन टेस्टस् पैकी १५ जणांचे तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आले असून ८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर आज पहूर येथे पुन्हा पती, पत्नी सह एक व्यवसायिक असे तीन जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी पहूर गावातील एकूण बाधितांची संख्या ७१ झाली असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, रॅपिड अँटीजेन टेस्ट कामी नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी- डॉ. राजेश सोनवणे, नोडल ऑफीसर डॉ. हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी – डॉ. आर के . पाटील, डॉ . प्रशांत महाजन, डॉ. वैशाली चांदा, डॉ. जयश्री पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – दिपक पोहेकर सर्व वैद्यकीय कर्मचारी यंत्रणेसह , महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, पं. स. प्रशासन,सर्वांचे सहकार्य लाभत आहेत.