Home क्राईम पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मंचरजवळ अपघात झाला. दाट धुक्यामुळे जीपचालकला अंदाज न आल्याने जीपने पाठीमागून ट्रकला धडक दिली.

सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पुण्याकडे निघालेल्या जीपने पाहाटे पाचच्या सुमारास ट्रकला मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे जीपचालकाला अंदाज आला नाही. जीप चालक पंकज खंडु जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (वय ५० सर्व रा. सायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिकः) यांचा मृत्यू झाला. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेंद्र हिले आणि पोलीस शिपाई मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदतकार्य सूरू केले. वाहनांना रस्ता मोकळा करुन दिला. दाट धुके असल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Protected Content

Play sound