धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भामर्डी येथे बखळ जागेवर नाव लावण्याच्या कारणावरून एका तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण कुटुंबातील तीन सदस्यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सरपंचासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भामर्डी येथे दशरथ सुभाष वानखेडे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, त्यांच्या मालकाची बखळ जागेवर आईचे लाव लावण्यासाठी अर्ज केला होता. या रागातून मंगळवार १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता गावातील सरपंच दगा लहू शिलावट याने जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर सरपंच शिलावट याच्यासह बापू लहू शिलावट, विजय छगन शिलावट, नाना संतोष शिलावट, मंडराज संतोष शिलावट, संतोष पोपट शिलावट सर्व रा. भामर्टी यांनी दशरथ वानखेडे याला मारहाण केली. तसेच त्यांची पत्नी आणि आई यांना जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर दशरथ वानखेडे यांनी बुधवारी १३ मार्च रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दगा लहू शिलावट, बापू लहू शिलावट, विजय छगन शिलावट, नाना संतोष शिलावट, मंडराज संतोष शिलावट, संतोष पोपट शिलावट सर्व रा. भामर्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी कुणाल सोनवणे हे करीत आहे.