Home क्राईम एकाच कुटुंबातील दोन महिला व मुलगा बेपत्ता

एकाच कुटुंबातील दोन महिला व मुलगा बेपत्ता

0
28

रावेर प्रतिनिधी । येथील एका कुटुंबातील दोन महिला व एक मुलगा बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबतचे वृत्त असे की येथील हूसेनि मस्जिद जवळ राहणारे आयेशा बी असलम महरूम (वय ४५ ), कैसर महरूम ( वय १२) व समाबी शेख युनुस (वय ३० ) हे गुरुवार दि. २५ रोजी सकाळी आठ वाजता भांडी, धुणे करण्याकरिता घराबाहेर पडले. मात्र सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाही. त्यांची शोधाशोध केली मात्र ते मिळून न आल्या मुळे शेख महंमद शेख यासिन यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून त्यांनी आपली मुलगी, नातु व भाची हरविल्याची नोंद केली आहे. या प्रकरणी मिसींगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉस्टेबल ईस्माईल शेख करित आहेत. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघे बेपत्ता झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound