सोशल मिडीयावर रिल्स तयार करण्याच्या कारणावरू‍न तिघा मित्रांना बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात दुचाकीवरून जाणाऱ्या तिन जणांना सोशल मिडीयावर रिल्स तयार करण्याच्या कारणावरून पाच जाणांनी अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकूर वय २६ रा. रेल्वे स्टेशन मिल परिसर, अमळनेर हा तरूण त्याचे मित्र राजेश सुनिल खरारे व दुर्गेश सोनवणे यांच्यासोबत शनिवारी १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ट्रिपल सिटने दुचाकीने अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागातून जात असतांना या परिसरात राहणारे सलमान रफा, आकी अलिी सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक आणि एजाज पठाण यांनी दुचाकी आडविली. सोशल मिडीयावर रिल्स बनवून टाकल्याच्या कारणावरून तिघा मित्रांना अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यात तिघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे सलमान रफा, आकी अलिी सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक आणि एजाज पठाण सर्व रा. गांधलीपूरा, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content