मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-अहमदाबार महामार्गावर घडली आहे.
मुंबई-अहमदाबार महामार्गावरील वसई सतीवली बजरंग हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्यानंतर कार डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वसई पोलीस दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी महामार्गावर काही वेळ वाहतूकीची कोंडी झाल्याने वाहतूक थप्प झाल्याचे पहायला मिळाले.