जयपूर वृत्तसंस्था । सेल्फीमुळे अनेकदा प्राणावर बेतत असते. अशीच एक दुर्घटना आज घडली असून सेल्फी काढण्याच्या नादात दाम्पत्यासह त्यांच्या मुलीस प्राण गमवावा लागला आहे.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील उनियारा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत एका तलावाजवळ सेल्फी घेण्याच्या नादात पती, पत्नी व मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सेल्फी घेताना मुलीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. मुलीला वाचवताना आई-वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली असून मानसिंह नरूका (४५), संजू कंवर (४३) अशी पती-पत्नीची नावे आहेत, तर लविता उर्फ तनू (१७) असे मुलीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.