पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यात तीन विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बहुळा धरणात एकाचा बुडून मृत्यू झाला असून एकाने गळफास घेतला तर एक जण रेल्वेखाली ठार झाला आहे. तालुक्यातील शिंदाड येथील सुनील गिरधर पाटील (वय४९) यांनी आज आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर समाधान एकनाथ पाटील (वय अंदाजे ३०) हे शनिवारपासून घरातून गायब होते. त्यांचा मृतदेह आज बहुळा धरणात आढळून आला आहे. तर आज रेल्वेखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. हे तिन्ही मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.