Home Cities जामनेर ‘त्या’ अपघातातील जखमी मुलीचाही मृत्यू; मृतांची संख्या तीनवर

‘त्या’ अपघातातील जखमी मुलीचाही मृत्यू; मृतांची संख्या तीनवर

0
22
accident eisher

accident eisher

जामनेर प्रतिनिधी । जामनेर ते पहूर दरम्यान झालेल्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू झाल्याने यातील मृतांनी संख्या तीन झाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सकाळी सात वाजेच्या दरम्यान पिंपळगाव गोलाईत जवळ जामनेर कडून पहुर रस्त्याने जाणार्‍या मोटर सायकल,रिक्षा व आयशर ट्रकचा विचीत्र अपघात झाला. आयशर ट्रक क्रमांक( एम.एच.४५/१६९६)ह्या गाडीने पहुरकडून जामनेरकडे जात असताना जामनेर कडून रिक्षा क्रमांक(एम.एच.२०/३१३७) व मोटर क्रमांक(एम.एच.१७/ऐ.पी.७६३७ या दोघं वाहनांना कट मारत जोरदार धडक दिली. यात रिक्षा पलटी होवुन त्यातील काही प्रवासी जखमी झाले. तर मोटर सायकलवरील बाबूलाल गुलाब पावरा(वय-४०) मंगलाबाई बाबूलाल पावरा(वय-३५) व मुलगी राधा बाबूलाल पावरा (वय-६) यांच्या मोटर सायकलला खुपच जोरदार धडक बसली. यात दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर राधा हिचा जळगाव येथे तातडीच्या उपचारासाठी नेत असताना म्रुत्यु झाला.

दरम्यान, या अपघातात रिक्षात बसलेले बिलकेस चौधरी(१८), रज्जाक चौधरी(४४),रोहन चौधरी(१४), सोहल चौधरी(११), रुकसार चौधरी(१६), सबेरा चौधरी(४०), व सुशिल काटकर(३५) हे जखमी झाले आहेत. हे सर्व जण जालना येथील रहिवासी असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, आयशर चालकाला पहुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound