लोकसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनाचा दावा ; भावना गवळींचे नाव चर्चेत

bhavna gawli

 

मुंबई (वृत्तसंस्था) सलग पाचव्यांदा निवडूनही मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे खासदार भावना गवळी या पक्षावर नाराज होत्या. परंतू त्यांची नाराजी लवकरच शिवसेनेकडून दूर केली जाण्याची शक्यता आहे. कारण आता शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा केला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेना पक्षश्रेष्ठींनी भाजपाकडे तीन मागण्या केल्या आहेत. अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरी त्यांच्याकडे अवजड उद्योग खात्याची जबाबदारी आहे. अरविंद सावंत यांच्याकडे महत्त्वाचे खाते सोपवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक हक्क आहे. बऱ्याच काळापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे आतातरी आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळालेच पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे.

Add Comment

Protected Content