चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील काझीपुरा फाट्याजवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी सव्वाआठच्या सुमारास काझीपुरा फाट्याजवळ कंटेनर व बोलेरोचा समोरा-समोर अपघात झाला. यात कारचे अक्षरश: तीन तुकडे झाले असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामध्ये नामदेव गुलाब कोळी (वय ३६, रा. मांजरोद, ता. शिरपूर ); अनिल दशरथ जाधव ( वय २२, बाभळाज ता. शिरपूर ) व किशोर गजानन बिर्हाडे (वय ३५, भागपुरा, ता. शिरपूर हे जागीच ठार झाले आहेत. तर सचिन पाटील ( वय १९, रा. शिरपूर ) हा गंभीर जखमी झाला आहे.