नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन सुरू करण्यात आले असून यात तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार सुलभ होणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान मोदी यांनी केली. देशात कोरोनाच्या एक नव्हे तर तीन लसींची चाचणी अंतीम टप्प्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधीत करतांना ते बोलत होते.
देशाच्या ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. यात त्यांनी आज विविध विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणार्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आधीच आत्मनिर्भर भारतचा नारा दिला आहे. या अनुषंगाने आज ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे. भारतात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
मोदी पुढे म्हणाले की, एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणार्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणार्या विदेशी गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आजवर आपण मेक इन इंडियावर भर दिला होता. आता मात्र यासोबत मेक फॉर वर्ल्डची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांना मिळालेले यश आणि यामुळे सर्वसामान्यांना झालेला लाभ याबाबत सविस्तर उहापोह केला. यात त्यांनी कृषी, उद्योग, सेवा, सुरक्षा आदी विविध भागांवर भाष्य केले. यात ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला आत्मनिर्भर केले आहे. आधी फक्त एक लॅब होती. तर आज देशभरात १४०० पेक्षा जास्त प्रयोगशाळा आहेत. आधी एन ९५ मास्क व व्हेंटीलेटर देशात बनत नव्हते. आज मात्र आपण याबाबत आत्मनिर्भर होणार असल्याचे पंतप
नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनला प्रारंभ झालेला आहे. यात आयुष्य सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. यात प्रत्येक नागरिकाला हेल्थ आयडी देण्यात येणार आहे. यात आपली डिजीटल कुंडली असणार आहे. यामुळे डॉक्टरांना उपचार करण्यासाठी एका क्षणात तात्काळ माहिती मिळणार आहे. कोरोनाच्या लसीबाबत पंतप्रधान म्हणाले की, देशात तीन व्हॅक्सीनची चाचणी अंतीम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. ही लस प्रत्येक भारतीयांसोबत कशी पोहचेल याचा आराखडा देखील तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.