Home राज्य सेल्फीच्या नादात बोट उलटली ; तीन मुलांचा बुडून मृत्यू

सेल्फीच्या नादात बोट उलटली ; तीन मुलांचा बुडून मृत्यू


naldurg

औरंगाबाद (वृत्तसंस्था) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरील नदीपात्रात बोटमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत इजहान एहसान (वय ५), सानिया (वय ८) आणि अल्मास (वय ८) या बालकांचा मृत्यू झाल्याचे कळते.

 

नळदुर्ग येथील एका कुटुंबातील मुले–मुली आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेली. किल्ला पाहिल्यानंतर सर्व जण बोटिंगकरून किनाऱ्याकडे येताना एक जण सेल्फी काढण्यासाठी उठला. त्यामुळे बोटीचा तोल जाऊन बोट कलंडली. सुरक्षा जॅकेट असल्याने बोटीतील सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, मात्र तीन जण अडकले. एका मुलीला बाहेर काढून तातडीने रुग्णालयाने नेण्यात आले पण तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound