Home Cities अमळनेर शेतातून तीन गुरांची चोरी; शेतकऱ्याचे नुकसान

शेतातून तीन गुरांची चोरी; शेतकऱ्याचे नुकसान

0
211

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द शिवारातील शेतातून बैलजोडी आणि गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबाबत सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भैय्या सुखदेव पाटील (वय ४३ रा. पिंपळे खुर्द ता. अमळनेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पिंपळे शिवारातील शेता गट क्रमांक ५७ मध्ये शेत आहे. १८ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या शेतातील गोट्यात बैलजोडी आणि गाय बांधुन ठेवलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गाय आणि दोन्ही बैल यांची चोरी केले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे


Protected Content

Play sound