Home राष्ट्रीय कारमध्ये अडकल्याने तीन भावंडांचा श्वास गुदमरून मृत्यू

कारमध्ये अडकल्याने तीन भावंडांचा श्वास गुदमरून मृत्यू


canva old broken car MACDX0Dew1s

इंदोर (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात खेळता-खेळता एका बंद कारमध्ये अडकलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा श्वास गुदरमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेजारीच्या एका रिकाम्या जमिनीवर उभ्या असलेल्या एका कारमध्ये पूनम (६ वर्ष), बुलबुल (४ वर्ष) आणि प्रतिक (३ वर्ष) हे तिघं भाऊ-बहीण सकाळी खेळण्यासाठी बाहरे पडले होते. हे तिघेही खेळता-खेळता कारमध्ये शिरले. या गाडीचा दरवाजा आतून बंद झाला. परंतु कारमधून कसे पडावं हे त्यांना लक्षात आले नाही. गाडी आतून लॉक झाल्याने तिनही मुले आत अडकली. जवळपास तीन तास ते कारमध्ये अडकल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही बंद कार गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. बऱ्याच वेळानंतर तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीचे लक्ष कारवर पडले आणि आत मुलं असल्याचे लक्षात आले. आरडा-ओरडा करत त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने तीनही मुलांना बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound