जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथून चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, एरंडोल शहरात चोरीची दुचाकी घेवून संशयित रित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चोरी दुचाकी घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपी अजय संजय मोरे (वय-२१) रा. सिध्दीविनायक पेट्रोल पंत सोनवड रोड, पिंप्री खुर्द ता. धरणगाव याला अटक केली. त्यांच्या ताब्यात चोरीची दुचाकी हस्तगत केली. त्याची अधिक चौकशी केली असता दीड महिन्यापुर्वी त्याचे साथिदार कल्पेश उर्फ रघु मगन पालचे (वय-२२) व नामदेव रोहिदार भिल (वय-२९) रा. भोद खुर्द रा. धरणगाव यांनी एरंडोल तालुक्यातील भोद खूर्द येथून उभी दुचाकी लांबविल्याचे कबुल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही संशयित आरोपींना अटक केली असून पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील आणि मुरलीधर बारी यांनी कारवाई केली.