Home क्राईम कारण नसतांना दोन भावांना जीवेठार मारण्याची धमकी; तीन दुचाकीचे नुकसान

कारण नसतांना दोन भावांना जीवेठार मारण्याची धमकी; तीन दुचाकीचे नुकसान

0
34

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळ्यातील गुरूदत्त कॉलनीत तीन दुचाकींचे नुकसान करून दोन भावंडाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अभियसिंग चव्हाण (वय-३१) रा. गुरूदत्त कॉलनी, पिंप्राळा जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबिंयांसह वस्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास प्रकाश कोळी रा. मढी पिंप्राळा, महेंद्र समाधान सपकाळे उर्फ दादू रा. बुध्दनगर, पिंप्राळा, उमाकांत वाघ रा. मिराबाई नगर पिंप्राळा आणि एक अनोळखी तरूण असे चार जण विजय चव्हाण यांच्या घरीसमोर येवून जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरूवात केली. आरोड्या मारण्याबाबत विजय चव्हाण याने हटकले असता चौघांनी घराचे खिडक्या दरवाजे यांचे नुकसान केले तर तीन मोटारसायकलीचे आदळआपट करून नुकसान केले आहे. तर विजय चव्हाण व त्याच्या भावाला चौघांनी शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत सोमवारी १९ जून रोजी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रकाश कोळी रा. मढी पिंप्राळा, महेंद्र समाधान सपकाळे उर्फ दादू रा. बुध्दनगर, पिंप्राळा, उमाकांत वाघ रा. मिराबाई नगर पिंप्राळा आणि एक अनोळखी तरूण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेल श्रध्दा रामोशी करीत आहे.


Protected Content

Play sound