अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलाड भागात एका तरुणाला काहीही कारण नसताना शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार २८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी २९ जून रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुस्तफा खान हशीर खान मेवाती वय-१९, रा.सारबेट ता.अमळनेर जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मिस्त्रीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शुक्रवार २८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मुस्तफा हा अमळनेर शहरातील पैलाड भागात एका टपरीवर चहा पीत होता. त्यावेळी त्याच्याच गावातील कादर खा गुलाब नबी खा; असलम खा गुलाब नबी खा; फरीद खा गुलाब नवी सर्व रा. सारबेटा ता. अमळनेर या तिघांनी काहीही कारण नसताना मुस्तफा खान हसीर खान या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी सळई मारून हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवारी २९ जून रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.