जुन्या वादातून एकाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायालयात दिवाणी दावा दाखल केल्याच्या रागातून तीन जणांना एकाला दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान खिमा चव्हाण (वय-४९) रा. होळहवेली ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. भगवान चव्हाण यांनी करतार हरी राठोड, ठाकुर हरी राठोड यांच्या विरोधात जामनेर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. याचा राग आल्याने करतार हरी राठोड, ठाकूर हरी राठोड दोन्ही रा. होळहवेली ता. जामनेर ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता जामनेर शहरातील शेतकी संघासमोर भगवान चव्हाण याला दगडाने मारहाण करून दुखापत केली. तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भगवान चव्हाण यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात करतार हरी राठोड, ठाकूर हरी राठोड दोन्ही रा. होळहवेली ता. जामनेर ह.मु. रामेश्वर कॉलनी, आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजू तायडे करीत आहे.

Protected Content