भारतीय क्रिकेट संघाला धमकीचे मेल

cricket teem

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर हल्ला करण्यात येईल, अशा धमकीचा मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) मिळाला आहे. पीसीबीने हा मेल बीसीसीआय आणि आयसीसीला फॉरवर्ड केला आहे. मात्र, भारतीय संघाला वेस्ट इंडीजमध्ये कोणताही धोका नाही, असे बीसीसीआय आणि आयसीसीने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघाला हल्ल्याचा धोका नाही. ३ ऑगस्टला वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ ३ सप्टेंबरपर्यंत तेथे असेल. टी-२० आणि वनडे मालिका संपली असून, दोन्हीही मालिका भारतीय संघानं जिंकल्या आहेत. २२ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा धमकीचा मेल थेट भारतीय संघाला न पाठवता पीसीबीला पाठवण्यात आला आहे. हल्ल्याची धमकी देणाऱ्या दहशतवादी गटाच्या नावाचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आलेला नाही. पीसीबीनं तात्काळ हा मेल बीसीसीआय आणि आयसीसीला फॉरवर्ड केला आहे. त्यानंतर बीसीसीआयनं याबाबत गृहमंत्रालयाला कळवले आहे. आयसीसी आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं ही अफवा असल्याचं म्हटलं असून, बीसीसीआयनं या वृत्ताचं खंडन केलं आहे.

Protected Content