जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुजदे गावात मागील भांडणाच्या कारणावरुन मजुर तरुणाला दोन जणांनी काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील सुजदे गावात संदीप पंडीत सोनवणे हे वास्तव्यास आहेत. संदीप हा गुरुवारी दुपारी १२ वाजता गावात पानटपरीवर तंबाखुची पुडी घेण्याासठी गेला होता, पुडी घेवून पुन्हा घरी परतत असतांना, पानटपरीसमोर गावातीलच गणेश पंढरी सोनवणे व धीरज मधुकर पाटील हे दोन्ही संदीपला भेटले, दोघांनी संदीपला शिवीगाळ करत तु काल बस फोडली होती, त्यावर संदीप याने मी बस फोडली नाही, असे समजावून सांगत असतांना, धीरज याने त्याच्या हातातील काठीने संदीपच्या पाठीवर तर गणेश याने सुध्दा काठीने संदीप यांच्या दोन्ही पायावर बेदम मारहाण केली, याचवेळी दोघांनी एकाद्या दिवशी तुला मारुन टाकू अशी धमकीही संदीपला दिली, मारहाणीत संदीप यास दुखापत झाली असून त्याच्या तक्रारीवरुन रात्री गणेश पंढरी सोनवणे व धीरज मधुकर पाटील या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू कोळी हे करीत आहेत.