भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडकारोड माहेर असलेल्या विवाहितेला माहेरून ५० हजारांची मागणी करत मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील खडकारोड येथील माहेर असलेल्या हिना एजाज पिंजारी (वय-२६) यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील एजाज इकबाल पिंजारी यांच्यासोबत १० नोव्हेंबर २०१७ रोजी रीतीरीवानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे तीन महिने चांगले गेले, त्यानंतर विवाहितेला शेती करण्यासाठी माहेरहुन ५० हजार रुपयांची मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून तिला शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करण्यात सुरुवात केली. त्यानंतर सासू-सासरे दीर दिरानी व इतरांनी देखील पैशांसाठी तगादा लावत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरुवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता विवाहितेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री नऊ वाजता पती एजाज इकबाल पिंजारी, सासरे इकबाल गंभीर पिंजारी, सासू इम्तियाज इकबाल पिंजारी, दीर फयाज इकबाल पिंजारी, दिराणी रेहाना उर्फ निलोफर फयाज पिंजारी सर्व रा. कंडारी तालुका भुसावळ आणि नणंद रुकसार अमिन पिंजारी, चुलत सासरे मुक्तार पिंजारी आणि अख्तर पिंजारी सर्व राहणार विवरे खुर्द ता रावेर यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पराग सोनवणे करीत आहे.