धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव जागृत जनमंचचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांन्वये वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा राग आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या नगरसेवकाने धरणगावातील स्थानिक पत्रकारास फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
यासंदर्भात अधिक असे, जितेंद्र महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धरणगाव नगरपरिषदेच्या २० कोटी रुपयांचा अपहार प्रकरणी याचिका सादर केलेली आहे. यासंदर्भात नुकतीच सुनावणी पार पडली. याबाबतच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये मा.मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक, सहा.लेखापरिक्षक विभाग जळगाव यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच पुढील तारखेला त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार जितेंद्र महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बातमी प्रसारीत करण्याची विनंती केल्यानुसार सदरील बातमी सर्व प्रतिनिधींनी प्रकाशित केली होती. परंतू, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी भगीरथ माळी यांच्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली. याबातमीचा राग आल्याने माजी नगरसेवक शिंदे गटाचे प्रवीण उर्फ वासुदेव रघुनाथ चौधरी यांनी धरणगावातील स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी भगीरथ माळी यांना भ्रमणध्वनी द्वारे तुम्हाला सोडणार नाही, अश्या प्रकारे धमकी देण्यात आली आहे. याप्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचीच मुस्कटदाबी, व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीला तसेच, प्रसार माध्यमांचा गळा घोटणाऱ्या शिंदे गटातील मस्तावलेले माजी नगरसेवक प्रवीण उर्फ वासुदेव रघुनाथ चौधरी हे पत्रकारांना धमकी देत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. व आम्ही सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत. व पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाने दिला आहे.
पोलीसांना निवेदन
धरणगाव पोलिसात निवेदन सादर प्रसंगी अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, शहराध्यक्ष विनोद रोकडे, सदस्य ॲड.व्ही.एस.भोलाणे, बी.आर.महाजन, धर्मराज मोरे, राजेंद्र रडे, भगीरथ माळी, प्रभुदास जाधव, आर.डी. महाजन, सतिष बोरसे, प्रा.सतिष शिंदे, विकास पाटील, धनराज पाटील, बाबूलाल बडगुजर, ॲड.आशिष बाचपाई, ॲड.हर्षल चौहाण, ॲड.स्वप्नील भाटिया, इब्राहीम शेख, आकाश बिवाल, कमलाकर पाटील, दिपक पाटील, अविनाश बाविस्कर, निलेश पवार, पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील, जितेंद्र महाजन यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.