चोपडा प्रतिनिधी । भाषाज्ञान, भाषाप्रभुत्व, शब्दांचे उच्चार, शब्दफेक, भावपूर्णता, स्तब्धता, प्रवाहीपणा, मूद्देसूदपणा, सुसंगतता, सहजता, चपखल शब्द, आवाजातील चढउतार, हावभाव व आत्मविश्वास यांच्या मदतीने सूत्रसंचालन रंजक बनवून कार्यक्रमाची उंची वाढविता येते असे मत उपप्राचार्य प्रा.बी.एस हळपे यांनी मांडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, म.गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित सूत्रसंचालन कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.के.एन सोनवणे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.माया शिंदे, प्रा.सुनीता पाटील, प्रा.उज्वला पाटील, प्रा.विशाल पाटील यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कविता बोरसे यांनी केले.