एरंडोल, प्रतिनिधी | तालुक्यातील भालगाव येथे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज (दि.१२) आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे ४.०० वाजता मनोज मराठे, कैलास पाटील व गावातील अन्य ११ जोडप्यांच्या असते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.
सकाळी ५.०० वाजल्यापासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. यावेळी भालगाव आणि परिसरातील २० ते २५ गावातील भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. कार्यकर्ते मनोज मराठे यांच्याकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी तीन क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच सोबत केळी व चहाचेही वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे मंदिरात दिंडी नेण्यात आली. आज यात्रेनिमित्त मंदिरात दिवसभर भजनाचा कार्यक्रम असून सकाळी ११००. वाजता गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच रात्री ह.भ.प. सी.एच.पाटील यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थानचे अध्यक्ष देविदास मराठे, कैलास चव्हाण, मनोज मराठे, देवराम पाटील, डिगंबर मराठे, सुभाष पाटील, श्रीराम मराठे, कैलास पाटील, लोटन पाटील, शरद काबरा, छोटू मराठे, संस्थानचे अन्य सदस्य व गावकरी यांनी परिश्रम घेतले.