२२ हजार बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी केला स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

BSNL

 

मुंबई वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य जाहीर केल्यानंतर ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (बीएसएनएल) आठवड्यातच कर्मचार्‍यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. यामुळे कंपनीला वर्षांला ७,००० कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत होणार आहे. केवळ दोन दिवसात बीएसएनएलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता आहे. सध्याला बीएसएनएलमध्ये १ लाख ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. व्हीआरएस योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २२ हजारांच्या वर गेली असून जवळपास ७७ हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. अर्ज करणाऱ्यांपैकी १३ हजार कर्मचारी ‘जी’ श्रेणीतील आहेत. या योजनेमुळे कंपनीच्या ७ हजार कोटी रूपयांची बचत होईल. ही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजना ४ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ३ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

Protected Content