भडगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भडगाव तालुकातर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोतीबाग येथे सपन्न झाले. यावेळी बोलतांना ”पक्षात राहून कुरघोडी करणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येईल” असा इशारा माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पाचोऱ्याचे माजी आ.दिलीप वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदशन केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नव्या फळीतील तरुणांनी हा कार्यकर्ता मेळावा मेहनत घेऊन यशस्वी केला तालुका भारतातून पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते. मात्र मागच्या काळात पक्षात विविध पद उपभोगलेल्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात पाठ फिरवली होती. त्यांना पक्षातून नारळ देऊन मागे टाका” असा सुर अनेकांच्या भाषणातून पुढे आला. त्यावर बोलताना दिलीप वाघ यांनी, “आगामी काळातील पक्षातील काम न करणाऱ्या व कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल” असा इशारा दिला.
पुढे बोलतांना ते म्हणाले, “मागील विधानसभा निवडणूक आर्थिक मुद्यावर झाली. उमेदवार उभा करून मतांचे विभाजन झाले. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. पराभवातून अनुभव घ्यायचा व पुढे चालायचे ही शिकवण आपल्याला आहे. कार्यकर्त्यांसाठी 2022 हे निवडणुकांचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जादूची छडी जिल्हा परिषदेत काम करून एकहाती सत्ता बसवेल. पुढे केंद्रातही महाविकास आघाडीचा फार्मूला काम करेल. आगामी निवडणुकांमध्ये महा विकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल व आपली सत्ता बसेल” असा विश्वास कार्यकर्त्यांना त्यांनी दिला.
“मागील काळात विधानसभा निवडणुकीत पक्षात राहुन उमेदवार विरोधी यंत्रणा राबविलेले लोक येथे आले नाही ते बरे झाले, मात्र पक्षात राहून कुरघोडी करणाऱ्यांचा हकालपट्टीचा कार्यक्रम केला जाईल. पक्षात कमी रहा, मोजके राहा पण प्रामाणिक राहा अशी भूमिका असू द्या. आगामी निवडणुकांना कार्यकर्त्यांसाठी मी झटेल, मदत करेन, त्यांना विविध पदावर बसवेल, पण ज्यांनी गद्दारी केली. त्यांचा राजकीय करेक्ट बंदोबस्त केला जाईल, काहींनी पक्षात राहून दडपण आणून परस्पर तिकीट घेतली, आता त्यांना सांगून कुस्ती खेळली जाईल. आगामी निवडणुकांमध्ये त्याची झलक पाहायला मिळेल” असे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती मनोगतातून डॉ. संजीव पाटील, मलकार, तावडे यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादी पदवीधर संघटना प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले , जिल्हा प्रवक्ते भूषण पाटील, डॉ संजीव पाटील, शालीग्राम मालकर , नितीन तावडे, स्नेहा गायकवाड, एस एन पाटील दत्तू मांडोळे, आदींनी कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, मनोगत व्यक्त केले.
या शिबिराला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माजी आ.दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, शालीग्राम मालकार यांच्यासह तालुका अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, दत्तात्रय पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील, रेखाताई पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष अरुण सोनवणे, शिवाजी पाटील, राजेश पाटील, जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड, माई विठ्ठल पाटील, युवक शहर अध्यक्ष विवेक पवार, जगदीश पाटील, विकी पाटील, अजय पाटील, कुणाल पाटील, शरद पाटील, एस एन पाटील, विक्की पाटील, दत्तू मांडोळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.