मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाबरी पडल्यावर जे काखेच्या बगला वर करत पळून गेलेत ते आज व्हीआयपी पाहुणे बनल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा एकदा शेलक्या शब्दांमध्ये टिकास्त्र सोडले आहे. आज पत्रकारांशी बोलतांना खासदार राऊत म्हणालो की, आज त्यांना जो इव्हेंट त्यांना करायचा करु द्या.. विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपाने जाहीर केलेत जे प्रभू रामाला हात धरुन मंदिरात नेत आहेत हे सगळे डरपोक बाबरीचे घुमट कोसळल्यावर जे पळून गेले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांना तेव्हा घाम फुटला, ते म्हणू लागले की हे आमचं कृत्य नाही. तेव्हा ती छाताडं, तुमची हिंमत सगळं कुठे गेलं होतं? बाळासाहेब ठाकरेंनी त्या लढ्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी त्यांची मनगटं आणि छाती पिचली होती. आता आम्हाला सत्तेचा माज दाखवू नका. आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय या लढ्यात उतरली होती. ज्यांनी हिंदुत्वाच्या मैदानातून पलायन केलं त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, बाबरी आम्ही पाडली नाही असे ते नाकारत असतांना त्यावेळी बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे अशी गर्जना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भाजपाने घाबरुन डरपोकपणे शिवसेनेवर फोडलं. ती जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीत व्हिआयपी कोण आणि ढोंगी कोण? आत्ता यांना कंठ फुटला आहे.